सोन्याचे अंड देणारी कोंबडी
सोन्याचे अंड देणारी कोंबडी
भारतातील अग्रगण्य राज्य म्हणजे महाराष्ट्र. हे राज्य उद्योग, तंत्रज्ञान, व्यापार, कला, शिक्षण इत्यादी सर्व आघाड्यांवर नेहमीच अग्रेसर ठरते. इथे सगळ्यात मोठी गुंतवणूक व आर्थिक उलाढाल तर होतेच पण महाजंगी महसूल गोळा होतो. राजधानी मुंबई व जोड शहर पुणे यांचे तर सर्वांना विलक्षण आकर्षण असते. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला इथे आपलीच सत्ता असावी असे वाटणे सहाजिकच आहे.
कर्मधर्मसंयोगाने असा योग नोव्हेंबर 2019 मध्ये आला. सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच हाती लागली व तिनीही पक्षात आनंदी आनंद झाला. धनदौलत व अमाप संपत्तीची आणि बेफाम सत्तेची स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागली.
पण घात झाला सत्ता ग्रहण करण्याच्या काही आठवड्यातच बडगा घेऊन करोना नावाचा चिनी गृहस्थ उपस्थित झाला आणि सगळी स्वप्नं धुळीला मिळाली. एवढेच नव्हे तर काही श्रेष्ठींच्या घरातच या गृहस्थांनी प्रवेश केला व दणका दिला. खरंतर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी चक्क खुडूक निघाली.
सद्य परिस्थितीला "भीक नको पण कुत्रा आवर" किंवा "घी देखा लेकिन करोना नही देखा" या दोन्ही म्हणी लागू पडतात.
Comments