Posts

Showing posts with the label Review

"दिवस आलापल्लीचे"

"दिवस आलापल्लीचे"  लेखिका निलिमा क्षत्रिय एक वाचकाचे मनोगत दिवस आलापल्लीचे हे पुरस्कारीत पुस्तक वाचले व फार आवडले म्हणून हे लिहीत आहे. आधी उज्ज्वलाने  वाचले आणि मला वाचण्याची शिफारस केली कारण हे मला नक्की आवडेल ह्याची तिला खात्री होती. ह्या आकाराचे पुस्तक वाचायला मला एक आठवडा तरी लागतो पण मी ते अतिशय वेगाने दोन दिवसातच संपवले. उज्ज्वलाने मात्र तिच्या नेहमीच्या वेगवान पद्धतीने काहीं तासांतच वाचले असावे. लेखिकेची विचार मांडण्याची पद्धत, भाषेवरील पकड, सुंदर व चपखल शब्दांचा वापर, मनुष्य स्वभावातील खाचाखोचा, कणव, सर्वत्र विनोदाची झालर आणि देवदत्त स्मरण शक्ती प्रकर्षाने जाणवली व आवडली. सगळ्या घटना एका दहा बारा वर्षीय मुलीच्या डोळ्यानी पाहिल्या व स्मृति पटलावर रुजवल्या, अनेक दशकानंतर मनात घोळवल्या आणि पुस्तकाच्या रूपाने बाहेर आणल्या. हे सगळं नैसर्गिक वाटते, कुठेही कृत्रिमपणाचा लवलेशही नाही. आलापल्लीचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करते. गाव, घरे, सॉ मील, रस्त्ते, फॉरेस्ट रेस्ट हाउस, आउट हाउस, क्लब हाउस, शाळा इत्यादी रूप धारण करतात. त्यातली माणसे जिवंत होतात.आलापल्लीत हिवाळा, उन्हाळा, प...